या देशाच्या पंतप्रधानांसाठी बनवलंय फायटर जेटच्या वासाचं परफ्युम!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुगंधी द्रव्यांची आवड अनेकांना असते. अनेक सेलिब्रिटी आपल्यासाठी खास सुगंधी अत्तरं बनवून घेतात. पण, एका देशाच्या पंतप्रधानांसाठी खास फायटर जेट अर्थात लढाऊ विमानाच्या वासाचं परफ्युम बनवण्यात आलं आहे.

या पंतप्रधानांचं नाव आहे व्लादिमीर पुतीन. व्लादिमीर यांच्यासाठी एका रशियन कंपनीने एक विशिष्ट प्रकारचं परफ्यूम तयार केलं आहे. परफ्युमर्स गिल्ड ऑफ रशिया असं या कंपनीचं नाव आहे.

या कंपनीने पुतीन यांच्यासाठी चेकमेट नावाचं एक परफ्युम बनवलं आहे. त्यात सु – 75 या फायटर जेटचा सुगंध आहे. हे विमान फिफ्थ जनरेशन तंत्रज्ञानापासून विकसित सुखोई विमान आहे.

हे खास पुतीन यांच्यासाठी बनवण्यात आलेलं अत्तर आहे. त्यात विमानाचं इंजिन, कॉकपिट किंवा इतर भाग बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काच, नैसर्गिक चामडं, धातू यांच्या सुगंधांचा वापर करण्यात आला आहे.