वकील राजहंस याच्या पोलीस कोठडीत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर येथील आपल्या फार्महाऊसमध्ये एमडी ड्रग्जची फॅक्टरी थाटून छुप्या पद्धतीने ड्रग्जचा धंदा करणारा वकील राजकुमार राजहंस याच्या पोलीस कोठडीत सोमवारी चार दिवसांची वाढ करण्यात आली. गेल्या आठवडय़ात अमली पदार्थविरोधी पथकाने कोल्हापूरच्या ढोलकरवाडीत छापा टाकून राजकुमार राजहंस याच्या फार्महाऊसमधील ड्रग्जची फॅक्टरी उद्ध्वस्त केली होती. त्यावेळी पोलिसांनी फॅक्टरीत काम करणारा लोहार आणि एका ड्रग्ज तस्कर महिलेला पकडले होते. त्यानंतर ड्रग्ज व्यवसाय करणारा वकील राजहंस याला मालाडमधून ताब्यात घेतले. त्याला अटक करून कोर्टात हजर केले असता पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. ती मुदत सोमवारी संपल्याने राजहंसला कोर्टात हजर केले होते. कोर्टाने राजहंसच्या पोलीस कोठडीत 25 नोव्हेंबरपर्यंत वाढ केली.