हिंदुस्थानात क्रिप्टोकरन्सीवर येणार बंदी? केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकार हिंदुस्थानात क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. देशात सर्व खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घातली जाऊ शकते. आगामी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकार यासंदर्भातील विधेयक आणणार आहे. अशी बातमी येताच, सर्व प्रमुख क्रिप्टोकरन्सीचे बाजार कोसळले आहे. यामधील अधिकतर क्रिप्टोकरन्सीमध्ये 15 टक्क्यांहून अधिकची घसरण झाली आहे.

यातच बिटकॉइनमध्ये सुमारे 15 टक्के, इथरियममध्ये 12 टक्के, टिथरमध्ये सुमारे 6 टक्के आणि USD नाण्यामध्ये सुमारे 8 टक्क्यांची घट झाली आहे. हिंदुस्थानात बिटकॉइनची किंमत 15 टक्क्यांनी घसरून 40,28,000 रुपये, इथरियमची किंमत 3,05,114 रुपये, टिथर सुमारे 76 रुपये, कार्डानोची किंमत सुमारे 137 रुपये झाली आहे.

सरकार आणणार विधेयक

सर्व क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ‘द क्रिप्टोकरन्सी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल, 2021’ मांडणार आहे. मंगळवारी रात्री यासंदर्भातली बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारचा या चनलासंदर्भातील नियम बनवण्याबरोबरच या डिजीटल माध्यमातील चलनासंदर्भातील नियमन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे देऊन त्यांच्या मार्फत जारी करण्यात आलेलं चलन अधिकृत मानून इतर सर्व खासगी चलनांवर बंदी घालण्याचा विचार आहे.