भंडाऱ्यातील दीडशे किलोच्या ‘पुष्पा’ची होतेय चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साऊथ  सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने जगभरात रेकॉर्डब्रेक कमाई केली. चित्रपटातील संवाद असो का गाणी सर्वांच्या ओठांवर रेंगाळत आहेत. मात्र, भंडाऱ्यात एका वेगळ्याच ‘पुष्पा’ची सध्या जोरदार चर्चा आहे. साकोली तालुक्यातील चांदोरी येथे चक्क ‘पुष्पा’ नावाचे बोकड  असून ते सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरले आहे.

25 महिन्यांचा हा बोकड 5 फूट उंच आणि पाच फूट लांब आहे. त्याचे वजन तब्बल दीडशे किलो आहे. पुष्पाला रोज खायला कुडकाभर तांदूळ आणि कुडका भर गहू लागतो. रस्त्यावरून ऐटीत चालणाऱ्या पुष्पाला पाहून भलेभले आपला रस्ता बदलतात. पुष्पाला खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांची झुंबड उडाली आहे. मात्र, आपल्या पुष्पाची वाढती लोकप्रियता पाहता मालकाने त्याची किंमत 2 लाख रुपये ठेवली आहे.