यूपीएससीत मुलींचा झेंडा, पहिल्या पाच उमेदवारांमध्ये चार मुली; मुंबईची प्रियंवदा म्हाडदळकर राज्यात प्रथम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) वर्ष 2021 च्या परीक्षांचा अंतिम निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत मुलींनी झेंडा रोवला आहे. यंदाच्या परीक्षेचे वैशिष्टय़ म्हणजे पहिल्या पाच उमेदवारांमध्ये चौघी मुलीच आहेत. नवी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेज आणि जेएनयू विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी श्रुती शर्मा ही देशात पहिली आली असून मुंबईची प्रियंवदा म्हाडदळकर हिने देशातून 13 वे स्थान, तर महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.

यंदा एकूण 685 उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यातील भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि पेंद्रीय सेवा, गट A आणि B मध्ये नियुक्तीसाठी यूपीएससीने या उमेदवारांची शिफारस केली आहे. या उमेदवारांमध्ये 244 सामान्य, 73 ईडब्ल्यूएस, 203 ओबीसी, 105 एससी आणि 60 एसटी प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे. परीक्षेच्या नियमांमध्ये समाविष्ट असलेल्या तरतुदींचा योग्य विचार करून उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येनुसार विविध सेवांवर या उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. यांपैकी शिफारस केलेल्या 80 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज तात्पुरते ठेवण्यात आले असून 1 उमेदवाराचा निकाल रोखून धरण्यात आला आहे. लेखी परीक्षा आणि मुलाखतीला बसलेल्या उमेदवारांचे गुण निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत वेबसाइटवर उपलब्ध होतील.

नागपूरच्या तीन उमेदवारांची बाजी

यूपीएससी परीक्षेत नागपूरचा टक्का वाढला आहे. भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूरमधून सहा उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. यातील तीन उमेदवारांनी बाजी मारली आहे. या उमेदवारांची नावे प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. प्रमोद लाखे यांनी जाहीर केली. शुभम भैसारे (97), सुमित रामटेके (358), शुभम नगराळे  (568) यांनी यशाचा झेंडा फडकविला आहे. यातील शुभम भैसारे यांनी 2018 मध्येही यूपीएससी क्रॅक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी केवळ एका गुणाने त्यांची संधी हुकली होती. मात्र या अपयशाने खचून न जाता पुन्हा तयारी करून शुभम यांनी यूपीएससीत पहिल्या 100 मध्ये स्थान पटकावले.

सामाजिक जाणिवेतून यूपीएससीकडे वळलो

लातूर जिह्यातील रामेश्वर सब्बनवाड यांनी 202 वा क्रमांक मिळवला आहे. रामेश्वर लातूर जिह्यातल्या हुंडरगुळी गावातील असून त्यांचे शिक्षण नवोदय विद्यालयात झाले आहे. त्यानंतर त्यांनी सीओईपीतून शिक्षण घेतले. इंजिनिअरिंगनंतर दोन वर्षानंतर त्यांनी नोकरी केली. 2019 मध्ये त्यांनी यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. पहिल्या प्रयत्नात ते मुलाखतीपर्यंत पोहोचले. मात्र त्यांचा रँक अवघ्या सहा मार्काने हुकला. दुसऱया प्रयत्नात त्यांना हे यश मिळाले. त्यांनी सांगितले, एकदा मी आजारी पडलो आणि मला गावाकडच्या दवाखान्यात जावे लागले. तिथली परिस्थिती पाहून मला समाजासाठी काहीतरी वेगळं करायला हवे याची जाणीव झाली आणि मी या परीक्षांकडे वळलो.

वर्ध्याच्या डॉ. आकांक्षा तामगाडगेला परराष्ट्र सेवेचा ध्यास

सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेची विद्यार्थिनी डॉ.आकांक्षा तामगाडगे यांनी यूपीएससी परीक्षेत 562 वा क्रमांक पटकावला आहे. त्यांना परराष्ट्र सेवेत जाण्याचा ध्यास आहे. 2018 मध्ये एमबीबीएस उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी यूपीएससीच्या तयारीला सुरुवात केली. पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यापेक्षा केंद्रीय परीक्षा देण्याकडे डॉ.आकांक्षा यांचा कल असल्याने त्या पुण्यात राहून खासगी वर्गात शिकल्या. आणि अखेर तिसऱया प्रयत्नात यशस्वी झाल्या.

यूपीएससीतील दहा टॉपर्स

  • 1    श्रुती शर्मा
  • 2    अंकिता अग्रवाल
  • 3    गामिनी सिंगला
  • 4    ऐश्वर्या वर्मा
  • 5    उत्कर्ष द्विवेदी
  • 6    यक्ष चौधरी
  • 7    सम्यक एस.जैन
  • 8    इशिता राठी
  • 9    प्रीतम कुमार
  • 10   हरकीरत सिंह रंधवा

शेतकऱयाचा मुलगा झाला आयएएस

सातारा येथील जावळी तालुक्यातील सनपाने गावातील ओंकार मधुकर पवार यांनी यूपीएससीमध्ये देशात 194 वा रँक मिळवला आहे. दोन वर्षांपूर्वी ओंकार यांची यूपीएससीमधून पॅरामिल्ट्री फोर्समध्ये अधिकारी, तर त्यानंतर आयपीएससाठी देखील निवड झाली होती. परंतु, आयएएस होण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण सनपाने येथील प्राथमिक शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, हुमगांव येथे झाले. त्यानंतर पुणे येथून इंजिनिअरिंगचं शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे.

वार्षिक 81 लाख पगाराच्या नोकरीवर पाणी सोडून यूपीएससीची तयारी

राज्य राखीव पोलीस दलाचे अपर पोलीस महासंचालक चिरंजीवी प्रसाद यांचा मोठा मुलगा रामेंद्र प्रसाद यांनी मुंबईतील वार्षिक 81 लाख पगाराच्या नोकरीवर पाणी सोडून यूपीएससीची तयारी केली. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत रामेंद्र यांनी यूपीएससीत 180 वा क्रमांक पटकावला. आयआयटी खडकपूर येथून बीटेक झाल्यानंतर त्यांना मुंबईतील एका कंपनीत वार्षिक तब्बल 81 लाखांचे पॅकेज मिळाले होते. मात्र वडिलांप्रमाणे आयपीएस अधिकारी होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न त्यांना नोकरीत रमू देत नव्हते. मागील तीन वर्षांपासून रामेंद्र प्रसाद जालना येथील एका आश्रमात एकटे राहून यूपीएससीची तयारी करीत होते. यंदा त्यांचे आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

यूपीएससी परीक्षेत देशात 295 वा रँक मिळवणारा 26 वर्षीय रोहन कदम हा विलेपार्ले येथे राहणारा आहे. त्याचे शालेय शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात मराठी माध्यमातून झाले. त्यानंतर त्याने रुईया महाविद्यालयातून इकॉनॉमिक्स विषय घेऊन बीएचे शिक्षण पूर्ण केले. सध्या तो पुण्याच्या गोखले इन्स्टिटय़ूटमध्ये शिक्षण घेत आहे.

यूपीएससीतील महाराष्ट्रातील टॉपर्स

  • प्रियंवदा म्हाडदळकर       (13)
  • अंजली श्रोत्रीय  (44)
  • श्रद्धा गोमे (60)
  • शुभम भैसारे    (97)
  • अंकित हिरडे    (98)
  • आदित्य काकडे (129)
  • निखील पाटील (139)
  • शुभम भोसले   (149)
  • विनय कुमार गाडगे (151)
  • रामेंद्र प्रसाद     (180)
  • ओंकार पवार    (194)
  • रामेश्वर सब्बनवाड   (202)
  • अक्षय वाखारे   (203)
  • अर्जित महाजन       (204)
  • अक्षय महाडिक       (212)
  • तन्मयी देसाई  (224)
  • अभिजित पाटील     (226)
  • तन्मय काळे    (230)
  • इशान टिपणीस       (248)
  • प्रतिक मंत्री (252)
  • सोहम मांढरे    (267)
  • सागर काळे (280)
  • रोहन कदम (295)
  • गजानन बाळे   (391)
  • वैभव काजळे    (325)
  • अभिजित पठारे       (333)
  • राहुल देशमुख   (349)
  • केतन पंढेरे (416)
  • स्वप्नील पवार (418)
  • ओमकार शिंदे   (433)
  • रोशन देशमुख (451)
  • देवराज पाटील (462)
  • अनिकेत कुलकर्णी    (492)
  • शिल्पा खनीकर       (512)
  • अस्मर धनविजय    (558)
  • नीतिश डोमले   (559)
  • नीरज पाटील    (560)
  • आशिष पाटील (563)
  • शुभम नगराळे (568)
  • अमित लक्ष्मण शिंदे (570)
  • स्वप्निल माने (578)
  • प्रशांत डगळे     (583)
  • अभय सोनारकर      (620)
  • अश्विन गोळपकर    (626)
  • मानसी सोनवणे      (627)
  • अमोल आवटे   (678)