कुणाकडूनही धमकी आली नाही! सलमान खानची पोलिसांना माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे ठार मारू अशा धमकीचं पत्र आल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालं होतं. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आणि सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे. मात्र धमकीचं हे वृत्त सलमान खाननं फेटाळून लावलं आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने पोलिसांना दिलेल्या निवेदनात, अलिकडच्या काळात कोणत्याही व्यक्तीकडून धमकी, धमकीचे कॉल किंवा कोणाशीही वाद झाल्याचा इन्कार केला आहे.