दिवाळीनिमित्त मृत कामगारांच्या कुटुंबीयांना फराळ वाटप, भारतीय कामगार सेनेचा अनोखा उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या वर्षभरात विमानतळ विभागातील मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना भारतीय कामगार सेनेच्या विमानतळ विभागाच्या वतीने दिवाळीनिमित्त फराळ आणि आर्थिक सहाय्य देण्यात आले. भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर आणि कार्याध्यक्ष अजित साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी दिवंगत कामगारांची आठवण ठेवल्याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनी भारतीय कामगार सेनेचे आभार मानले.

सदर उपक्रम भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली गेली आठ वर्षे मुंबई विमानतळ येथे राबविण्यात येतो. यावेळी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस प्रमोद गावकर, संतोष कदम, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, पोपट बेदरकर, सहचिटणीस जगदीश निकम, विजय शिर्पे, मिलिंद तावडे, संजीव राऊत, नीलेश ठाणगे, बाबा शिर्पे आणि विमानतळ विभागातील सर्व पदाधिकारी, कमिटी सदस्य आणि कामगार उपस्थित होते.