पंतप्रधान मोदी आज मुंबईत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. छत्रपती शिवाजी टर्मिनसवर आयोजित कार्यक्रमात ‘वंदे भारत’ ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर मरोळ येथे दाऊदी बोहरा समाजाच्या  नवीन पॅम्प्सचे मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होईल. मोदी यांचा दोन महिन्यांतील हा दुसरा मुंबई दौरा आहे.

मोदी यांच्या दौऱ्यामुळे पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमामुळे शुक्रवारी दुपारी दोन ते चार या वेळेत कुलाबा, पी. डीमेलो रोड ते छत्रपती शिवाजी टर्मिनस व दुपारी चार ते सहा या वेळेत मुंबई विमानतळ ते मरोळ येथील वाहतूक संथगतीने होण्याची शक्यता आहे.