
हिंदुस्थानी तरुणाने इंग्लिश सुधरण्यासाठी फिलीपिन्स मुलीसोबत चॅटींग करायला सुरुवात केली. दोघांमध्ये मैत्री वाढली, मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि लॉंग डिस्टन्स रिलेशनशीप चालली. नंतर या प्रेमीयुगुलाने कोर्ट मॅरिज केले. कपलने याबाबत एका युट्युब व्हिडीओमधून आपली प्रेमकहाणी शेअर केली आहे.
प्रकाश पंचाल असे त्या तरुणाचे नाव असून तो एक युट्युबर आहे. त्याचे युट्युबवर 10 हजारहून अधिक सब्रस्क्रायबर आहेत. तो कायम फिलिपिन्सला राहणारी पत्नी थेरेससोबत व्हिडीओज शेअर करतो. प्रकाश हिंदू असून त्याची पत्नी ईसाई धर्माची आहे. प्रकाशला 2008 साली कॉलेज झाल्यानंतर त्याच्या मामाने त्याला इंग्रजी शिकण्यावर भर देण्याचा सल्ला दिला होता. त्याने मामाची ती गोष्ट फार गांभिर्याने घेतली. पण इंग्रजी सुधरण्यासाठी ते बोलायचे तरी कोणासोबत असा त्याच्यासमोर प्रश्न होता. याच दरम्यान ऑनलाईन प्लॅटफॉर्म हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे जिथे तो लोकांशी इंग्रजीमध्ये बोलू शकतो.
प्रकाशने व्हिडीओत सांगितले आहे की, 2008 साली याहू मेसेंजरची फार क्रेझ होती. याच दरम्यान मी अमेरिकेतील काही लोकांशी बोलणी सुरु केली. मात्र मी हाय..हाऊ आर यू च्या पुढे बोलू शकलो नाही. अमेरीकेतील लोकं अशा पद्धतीने बोलायचे की ते डोक्यावरुन निघून जायचे. प्रकाशने सांगितले की, मी याहू मेसेंजरवर फिलिपिन्स लोकांशी गप्पा मारल्या, त्या लोकांशी बोलायला लागलो त्यामुळे इंग्रजी सुधारायला लागली. दरम्यान त्याची ओळख थेरेसशी झाली आणि ती त्याची पत्नी आहे. सुरुवातीला आम्हा दोघांमध्ये फारसे बोलणे व्हायचे नाही. 2010 साली मी फेसबुक जॉईन केले. या दरम्यान जी लोकं त्याच्यासोबत याहूला जोडली होती, ते फेसबुकला दिसू लागले. तिथे मात्र त्याचे थेरेसशी बोलणे वाढले.
View this post on Instagram
त्यानंतर प्रकाशने थेरेसला प्रपोज केला. त्यावेळी थेरेसने त्याच्याकडे थोडा वेळ मागितला. दरम्यान त्यांचे बोलणे सुरुच होते. त्यानंतर प्रकाशने आपल्या नात्याबाबत घरी सांगितले. त्यानंतर त्याने फिलिपिन्सला जाण्याचा प्लॅन केला. मात्र त्याचा व्हिजा कॅन्सल झाला. त्यानंतर तो सिंगापूरहून फिलिपिन्सला गेला आणि तिथे गेल्यावर दोघांनी कोर्ट मॅरजि केले.



























































