
चार दिवसांपासून भूमिगत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अंगावर पेट्रोल ओतून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. तुपकर पोलिसाच्या वेशात येथे आले होते.
पीकविमा, अतिवृष्टीची रखडलेली मदत, कापूस दरवाढ यासाठी रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. त्यांची पोलिसांकडून शोधाशोध सुरू असल्याने ते चार दिवस भूमिगत झाले होते. त्यांनी सरकारला 10 फेब्रुवारीचा अल्टिमेटम दिला होता. आज तुपकर पोलिसाच्या वेशात शेतकऱयांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले आणि त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

























































