
गोवंडीच्या डॉ.झाकिर हुसेन नगरात विवाहितेने आत्महत्या केली असून तिला आत्महत्या करण्यास पतीनेच प्रवृत्त केल्याचा गुन्हा देवनार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
हिना असे त्या विवाहितेचे नाव होते. हिनाचा विवाह इफ्तार अहमद (27)याच्याशी झाला होता. मात्र इफ्तार तिला सतत मारहाण करायचा. 9 तारखेच्या रात्री इफ्तारने आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळे हिनाने आपले आयुष्य संपवले अशी तक्रार हिनाची आई साबिना खान यांनी पोलिसांकडे केली होती. त्या तक्रारीवरून पोलिसांनी इफ्तारला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.



























































