
सोनी मराठी वाहिनीवरील ‘प्रतिशोध – झुंज अस्तित्वाची’ ही आई आणि मुलगी यांच्या विशिष्ट नात्यावर भाष्य करणारी थरारक मालिका आहे. भूतकाळातील काही विशिष्ट गोष्टींमुळे ममता आणि दिशा यांना त्यांच्या भविष्यात कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते आहे हे आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळते. या मालिकेतील प्रमुख व्यक्तिरेखा ममता, दिशा आणि शन्नोबी यांनी अनोख्या आणि प्रेरणादायी पद्धतीने जागतिक मातृदिन साजरा केला. त्यांनी वर्सोवा येथील ‘द ट्रान्स कॅफे’ आणि गोरेगावच्या ‘ट्विट फाऊंडेशन’ येथील तृतीयपंथी कर्मचाऱयांबरोबर संवाद साधला आणि उपजीविकेसाठी प्रयत्न करत असताना त्यांना येणाऱया आव्हानांवर प्रकाश टाकला. त्यांच्या कार्यातून ममतालादेखील प्रेरणा मिळाली आणि तिच्या आयुष्यात येणाऱया समस्यांना सामोरे जाण्यास याची नक्कीच मदत होईल.


























































