चंद्रपूर – गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू, मृतांमध्ये 2 सख्ख्या भावांचा समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील आसोलामेंढा येथे ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश चतुर्थीनिमित्त शहरात गणपती विसर्जनाच्या वाजत-गाजत मिरवणुका निघाल्या होत्या. काही गमणपतींचे लहान तलावामध्ये विसर्जन करण्यात आले, तर मोठ्या गणपतीचे विसर्जन आसोलामेंढा येथील नहारात करण्यात आले. येथे गणपती विसर्जन करताना पाच जण बुडाले. यातील दोघे वाचले, तर तिघे वाहून गेले.

स्थानिकांनी वाहून गेलेल्यांपैकी एकाला पकडले आणि नहारातून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. गुरुदास मोहूर्ले असे या तरुणाचे नाव आहे. तर लहान भावाला वाचवण्यासाठी नहारात उडी मारलेला मोठा भाऊही पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेला. निकेश आणि संदीप गुंडावर अशी दोघा भावांची नावे आहेत. दोघांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाही.