सर्दी-खोकला झाल्यास कोणती फळे आहारात ठेवावी, तर कोणती टाळावी; जाणून घ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थंडीत शरीराची उष्णता वाढवणारे पदार्थ खाल्ले जातात. या दिवसांत थंड हवा, वातावरणातील गारवा यामुळे सर्दी-खोकल्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे आहारात कोणत्या फळांचा समावेश करावा, कोणत्या नाही याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. हिवाळ्यात ऋतुमानानुसार मिळणाऱ्या फळांचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. काही फळे अशी असतात जी वर्षभर उपलब्ध होऊ शकतात, अशी फळेही थंडीच्या दिवसांत खाल्ली तरी चालतात.

थंडीचा प्रभाव कमी करून शरिरात प्रतिकारक्षमता अधिक वाढावी याकरता जीवनसत्त्वेही अधिक आवश्यक आहेत. सध्या भाजीपाला मोठ्याप्रमाणत रासायने वापरून पिकवला जातो यामुळे बऱ्याच मोठ्याप्रमाणात जिवनसत्त्वाचा नाश होतो. त्यामुळे शरिरास आवश्यक असलेली जीवनसत्त्वे सहज मिळत नाही. ती फळांमधून मिळतात. म्हणून आहारात फळांचा समावेश असावा. मात्र त्यासाठी कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावी हे पुढे दिले आहे.

जाणून घेऊया सर्दी-खोकला झाल्यास कोणती फळे खावीत, कोणती टाळावी याविषयी –

pomegranate

डाळिंब

सर्दी झाल्यावर होणारा विषाणूंचा संसर्ग दूर करण्यासाठी अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध असणारे डाळींब खावे. सर्दी-खोकल्यावर उपाय म्हणून डाळिंबाचा रस प्यायल्यासही फायदेशीर ठरते. डाळिंबातील अँटी-इंफ्लेमेटरी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म खोकला दूर करण्यासही गुणकारी ठरतात.

किवी

 kiwi

किवी अनेक पोषक तत्त्वांनी समृद्ध आहे. त्यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी किवी अत्यंत प्रभावी आहे. यातील पोषक तत्त्वे सर्दी-खोकला दूर करण्यासाठी मदत करतात. संसर्गाशी लढतात. यामुळे सर्दी-खोकल्यावर आराम मिळतो.

 

apple

सफरचंद

सफरचंदात फ्लेव्होनॉइड्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. जे सर्दी, सर्दी, मधुमेह आणि हृदयाच्या समस्या दूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

 

 

ही फळे खाणे टाळा

द्राक्ष, लिंबूवर्गीय फळे थंडीच्या दिवसांत खाणे टाळावे. या फळांमुळे अॅसिड रिफ्लक्स होण्याची म्हणजे खोकला आणि सर्दी होण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे सर्दी-खोकला झाल्यास ही फळे खाणे टाळावे. जी फळे आंबट असतात, ती खाल्ल्याने सर्दी-खोकल्याचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे त्रास होण्यापूर्वी काळजी घ्यावी.