
मध्यप्रदेशमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या आणि निकाल लागला. मात्र, या निवडणुकींच्या रणधुमाळीत चर्चेचा विषय ठरले आहेत ते छिंदवाडा शहरातील लालबागचे दोन व्यापारी. मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 18 नोव्हेंबरला, या दोघांनी छिंदवाडा विधानसभेच्या उमेदवारांवर पैज लावली होती.
छिंदवाडा शहरातील लालबागचे दोन व्यापारी प्रकाश साहू यांनी कमलनाथ यांच्या बाजूने आणि राम मोहन साहू यांनी भाजपाच्या उमेदवार बंटी साहू यांच्या बाजूने पैज लावली होती. जर कमलनाथ यांचा विजय झाला तर राम मोहन साहू हे प्रकाश साहू यांना 1 लाख रुपये देणार होते, तर भाजपाचे उमेदवार बंटी साहू विजयी झाले तर प्रकाश साहू हे राम मोहन साहू यांना 10 लाख रुपये देणार होते. तीन साक्षीदारांच्या समक्ष ही पैज लागली होती. पैज लावल्यानंतर त्यांनी साक्षीदारांकडे पैजेची रक्कम सुध्दा जमा केली होती.
3 डिसेंबर रोजी, मध्यप्रदेश सहीत राजस्थान, तमिळनाडू आणि छत्तीसगड या राज्यांचे निकाल जाहीर झाले. या निकालांनूसार मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार कमलनाथ यांचा 36 हजार 594 मतांच्या फरकाने दणदणीत विजय झाला. तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार बंटी साहू यांना पराभव पत्करावा लागला. कमलनाथ यांनी आपल्या मतदारसंघात 1 लाख 32 हजार इतके मताधिक्य मिळवले आणि विजय संपादीत केला.
राम मोहन साहू आणि प्रकाश साहू यांनी लावलेल्या पैजेनुसार प्रकाश साहू पैज जिंकले. त्यामुळे राम मोहन साहू यांनी प्रकाश साहू यांना 1 लाख रुपये देऊ केले होते. पैज विजेत्या प्रकाश साहू यांनी मनाचा मोठेपणा दाखवत जिंकलेली 1 लाख रु रक्कम गोशाळेला दान केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे.


























































