
संसद भवनाच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी लोकसभा सचिवालयाने मोठी कारवाई केली आहे. लोकसभा सचिवालया सुरक्षा कर्मचाऱ्यांशी संबंधित 8 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. रामपाल, अरविंद, वीरदास, गणेश, अनिल, प्रदीप, विमित, नरेंद्र अशी या कर्मचाऱ्यांची नावे असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.
Lok Sabha Secretariat has suspended total eight security personnel in yesterday’s security breach incident.
— ANI (@ANI) December 14, 2023
बुधवारी नक्की काय घडलं?
– लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरळीतपणे पार पडला. त्यानंतर झीरो अवर सुरू झाला. त्यात भाजपचे पश्चिम बंगालमधील खासदार बवेश मुर्मू हे प्रश्न उपस्थित करत असतानाच सभागृहात मोठा आवाज झाला.
-खासदारांनी मागे वळून पाहिले तर दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारल्याने सगळेच हादरले. हे तरुण थेट खासदारांच्या बाकांवर चढून घोषणा देऊ लागले. एका तरुणाने शूजमधून स्मोकबॉम्ब काढून तो पह्डला.
– सभागृहात पिवळय़ा आणि हिरव्या रंगाच्या धुराचे लोळ उठल्याने घबराट पसरली. खासदारांची पळापळ झाली. प्रचंड गोंधळ निर्माण झाला. बेफामपणे उडय़ा मारत एक आंदोलक सभापतींच्या आसनाच्या दिशेने जात होता. त्याला काही खासदारांनी घेरून पकडले.
– दोन्ही तरुणांना खासदारांनी पकडले. यावेळी एका तरुणाला चांगलाच चोप देण्यात आला. सभागृहात हल्ला झाला त्याचवेळी बाहेर त्यांच्या साथीदारांनी घोषणाबाजी करत स्मोकबॉम्ब फोडले.
– खासदार मुकुल नागर यांनी या तरुणांना अडविण्याचे धाडस दाखविले. काँग्रेसचे गटनेते अधिररंजन चौधरी, सुनील मेंढे व इतर खासदारांनी त्यानंतर या तरुणांना पकडून सुरक्षा रक्षकांच्या हवाली केले.
– धुरामुळे डोळय़ांना त्रास होत होता. स्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पीठासीन अधिकारी राजेंद्र अगरवाल यांनी कामकाज तहकूब केले.
सरकार प्रचार आणि सभांमध्ये मग्न, देशाची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर; संजय राऊत यांची टीका
पाच जणांना अटक
लोकसभेतील दोन घुसखोरांना अटक करण्यात आली असून अन्य दोघांना संसदेबाहेर अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडील सर्व वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच पोलिसांनी याप्रकरणी आणखी एकाला अटक केली आहे. आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली असून संसद मार्ग पोलीस स्थानकात आरोपींविरोधात भादवि कलम 130 बी, 452, 153, 186, 353 आणि यूएपीए कायद्याच्या कलम 16 आणि 18 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

























































