
उत्तर प्रदेशच्या महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाली. त्यात अनेक भाविकांचा मृत्यूही झाला. चेंगराचेंगरी नेमकी कशी याची आपबिती उपस्थित भाविकांनी सांगितली. स्पेशल ड्युटीवर असलेल्या आकांक्षा राणा म्हणाल्या की संगमजवळील गर्दीमुळे बॅरीयर तुटले आणि चेंगराचेंगरीत अनेकजण जखमी झाले. या सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं गेलं. नेमके किती लोक जखमी झाले हे सांगता येत नाही असेही राणा यांनी सांगितले.
या कुंभमध्ये कर्नाटकहून आलेल्या सरोजिनी म्हणाल्या की आम्ही दोन बस करून 60 जण आलो होतो. आमच्या ग्रुपमध्ये नऊ जण होते. कुंभमध्ये जाताना अचानक गर्दीचा लोंढा आमच्या अंगावर. या गर्दीत आम्ही आडकलो. अनेकजण आमच्या अंगावर पडले, संपूर्ण गर्दी नियंत्रणाच्या बाहेर होती असे त्यांनी सांगितले.
मध्य प्रदेशमधून आलेल्या एका माणसाने सांगितले की माझी आई जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच मेघालयमधून एक वृद्ध दाम्पत्य या चेंगरांचेंगरीत कसे बसे बचावल्याचेही त्यांनी सांगितले.
एका महिलेचा मुलगा या चेंगराचेंगरीत जखमी झाला. त्यांना सांगितले की या गर्दीतून बाहेर पडायला जागाच नव्हती. काही लोक हसत खिदळत आम्हाला ढकलत होते, आम्ही पाया पडून त्यांना असे करू नका म्हणत होतो असेही या महिलेने यावेळी सांगितले.





























































