Air India Plane Crash – ATS ने DVR ताब्यात घेतला, कशी घडली विमान दुर्घटना? लवकरच समोर येणार

Ahmedabad: Remains of an Air India plane that crashed moments after taking off from the Ahmedabad airport, Thursday, June 12, 2025. (PTI Photo)(PTI06_12_2025_000130B)

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत 290 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. एवढी मोठी दुर्घटना घडली कशी? असा प्रश्न या दुर्घटनेनंतर उपस्थित केला जात आहे. आता या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे. घटनास्थळावरून डीव्हीआर म्हणजे डिडिटल व्हिडिओ रेकॉर्डर सापडला आहे. तर विमानाच्या ब्लॅक बॉक्स मिळाल्याची चर्चा आहे. पण हे दावे एअर इंडियाने फेटाळून लावले आहेत. अद्याप ब्लॅक बॉक्स सापडला नसल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.

Air India plane crash – ‘मी उडी मारली नाही, तर…’, विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव प्रवाशानं सांगितलं काय चमत्कार झाला

अहमदाबाद एटीएसच्या अधिकाऱ्यांनी फॉरेन्सिक टीम सोबत घटनास्थळी तपास केला. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून काही नमुने गोळा केले आहेत. जवळपास तीन तास या पथकाने घटनास्थळी तपासणी केली आणि नमुने गोळा केले. आणि फॉरेन्सिकची टीम घटनास्थळावरून रवाना झाली आहे. तसेच घटनास्थळावरून एटीएसने विमानाचा डीव्हीआर म्हणजेच डिडिटल व्हिडिओ रेकॉर्डर आपल्या ताब्यात घेतला आहे. यामुळे विमानाचा खरंच अपघात झाला की हा घातपात होता? किंवा या दुर्घटनेमागे परदेशी शक्तींचा हात होता का? यासह इतरही गोष्टी स्पष्ट होणार आहेत.

Air India Plane Crash – ब्लॅक बॉक्स म्हणजे काय, तो अपघाताचे रहस्य कसे उलगडेल?

अहमदाबादमध्ये क्रॅश झालेल्या बोइंग 787 ड्रीमलायनर विमानाचा एक ब्लॅक बॉक्स आढळून आल्याचे आज सकाळपासून मीडिया रिपोर्ट्समधून सांगण्यात येत होते. पण अद्याप विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलेला नाही. जे काही मीडियातून दावे केले जात आहेत, त्यात तथ्य नसल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे. विमानाने उड्डाण घेताच ते पुढील काही सेकंदात कोसळले कसे? हे ब्लॅक बॉक्समधून कळण्यास मदत होते.

दरम्यान, दुर्घटनाग्रस्त विमानाच्या अवशेषांमधून विमानाचे डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हे दोन्ही सापडले आहेत. यामुळे एअर इंडियाचे हे विमान कुठल्या कारणाने कोसळले? हे लवकरच स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.