आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरात लोकोपयोगी उपक्रम

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरात अनेक लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन सुरू आहे. यामध्ये आरोग्य तपासणी शिबीर, शैक्षणिक साहित्य वाटप, गरजूंना मदत यासह अनेक सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले. शिवसेनायुवासेनेच्या वतीने आयोजित या लोकोपयोगी उपक्रमांचा लाभ हजारो गरजवंतांनी घेतला.

शिवसेना चेंबूर विधानसभा शाखा क्रमांक 155 च्या वतीने विभागातील दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विभागप्रमुख प्रमोद शिंदे, विभाग संघटक पद्मावती शिंदे, विधानसभाप्रमुख रुक्मिणी भोसले, विधानसभा संघटक विनयना सावंत, छाया हमिदानी, मुन्नी मदने, शोभा देसाई, दर्शना काsंडविलकर, रोहिणी नाकटे, राकेश बनसोडे, उपक्रमाचे आयोजक विधानसभा संघटक महेंद्र नाकटे, शाखाप्रमुख अशोक वीर, उपविभाग अधिकारी रूपेश मढवी यांनी केले होते.

शिवसेना शाखा क्र. 67 आणि प्रियदर्शनी फाऊंडेशन यांच्या वतीने प्रभागातील जुनेदनगर येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विधानसभा सहसंघटक ज्योत्स्ना दिघे, उपविभाग सहसंघटक पूजा पाटील, प्रियदर्शनी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उज्जय जाधव, शाखाप्रमुख दीपक सणस, स्वाती तावडे, रमेश वांजळे, रमेश पटेल, हंसा कोडिमल आदी उपस्थित होते.