मिस्टर शिंदे; मुंबई मराठी माणसाच्या घामातून, रक्तातून निर्माण झालीय; शेटजींच्या पैशातून नाही! संजय राऊत यांनी सुनावले

पुण्यातील एका कार्यक्रमात शहा सेनेच्या एकनाथ मिंधे यांनी ‘जय गुजरात’चा नारा दिला. उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या नाऱ्यावरून महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. यावर स्पष्टीकरण देताना शिंदे यांनी गुजरात पाकिस्तानमध्ये येत नाही, असे म्हटले होते. याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला.

शनिवारी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे हे या मंत्रिमंडळातील अत्यंत कच्चे मडके आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत ते अत्यंत गोंधळलेले आहेत आणि त्यातून त्यांच्याकडून अशी विधाने होतात. गुजरात पाकिस्तानमध्ये आहे असे आम्ही कुठे म्हणालो. गुजरात आणि महाराष्ट्र कधीकाळी एकच होता हे शिंदेंना माहिती नसेल. बडोदा हे गायकवाड यांचे मराठा संस्थान आहे आणि संपूर्ण गुजरातवर भोसल्यांचेच राज्य होते. म्हणून अमित शहा किंवा मोदी बडोद्याला गेल्यावर जय महाराष्ट्र म्हणत नाहीत.

इंदूर, ग्वालियर ही मराठी संस्थाने आहेत. होळकर आणि शिंदे यांनी तिथे राज्य केले. पेशवे पण तिकडेच गेले होते. म्हणून तिकडले राज्यकर्ते इथे मराठी राज्यकर्ते आले आणि राज्य केले म्हणून जय महाराष्ट्र म्हणत नाहीत. त्यामुळे उगाचच सारवासारव करू नका. आपण महाराष्ट्राला अपमानित करण्याचा प्रयत्न आपण करताय. खरे म्हणजे फडणवीस शिंदेंना अडचणीत आणताहेत. उत्तेजन देताहेत की वारंवार अशा भूमिका घ्या. फडणवीस त्यांना अडचणीत आणताहेत, असा दावाही राऊत यांनी केला. यावेळी संजय राऊत यांनी मिंध्यांचाही चांगलाच समाचार घेतला.

आमच्या विधायक गुंडगिरीमुळेच तुम्ही सन्मानाने CM च्या खुर्चीवर बसलेले आहात! संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला

गुजरातच्या बांधवांनी महाराष्ट्रात विकासकामे केली, मग पैसे नाही कमावले का? संपत्ती नाही कमावली का? मिस्टर शिंदे, ही मुंबई मराठी मजुरांच्या, श्रमीकांच्या, गिरणी कामगारांच्या घामातून आणि रक्तातून निर्माम झालेली आहे. शेटजींच्या पैशातून नाही. शिंदेंनी सगळ्यात आधी माफी मागायला पाहिजे आणि शिंदेची तरफदारी केल्याबद्दल आणि महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल फडणवीस यांनी माफी मागायला पाहिजे, असेही राऊत म्हणाले

शहा सेनेच्या एकनाथ मिंध्यांचे જય ગુજરાત