आमदार धस यांच्या मुलाच्या कारची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू

भाजपचे आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्या कारने दुचाकीला धडक दिली. अहिल्यानगर-पुणे महामार्गावर झालेल्या या अपघातात नितीन शेळके या तरुणाचा मृत्यू झाला. सुपा पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.