नरेंद्र मोदींना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व शरद पवारांनी मदत केली पण त्यांनी त्याचे पांग कसे फेडले ते सर्वांनी बघितलं – संजय राऊत

नरेंद्र मोदी व अमित शहांना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शरद पवार या दोघांनी मदत केली आहे. याबाबत मी माझ्या पुस्तकातही लिहलं आहे. पण या दोघांनी त्या मदतीचे पांग कसे फेडले ते आपण सर्वांनी पाहिलं आहे, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली.

”संकटकाळी सह्याद्रीच हिमालयाच्या मदतीसाठी जात असतात. गेल्या काही वर्षात अशा काही घटना घडल्या त्याचा सारांश शरद पवारांनी सांगितला. नरेंद्र मोदी व अमित शहांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व शरद पवार या दोन लोकांनी मदत केली आहे. मी माझ्या पुस्तकातही लिहलं आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर या दोघांना मदत केलीय पण त्या मदतीचे पांग कसे फेडले ते आपण पाहिलं”, असे संजय राऊत म्हणाले.