
दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या कुणकेश्वर तीर्थक्षेत्री दिवाळी पाडव्यानिमित्त मंदिर कमिटीच्या माध्यमातून रात्री मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला. तब्बल २१ हजार तेजोमय दिव्यांनी कुणकेश्वर मंदिर परिसर उजळून गेल्याचे पाहायला मिळाले. दीपपूजन म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय होय. दीप म्हणजे दिवा हे ज्ञान आणि मांगल्याचे प्रतीक आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे जाणे हे या पूजेचे मुख्य महत्त्व आहे. दिव्यांच्या प्रकाशाने घरातील आणि मनातील अंधकार दूर होतो अशी श्रद्धा आहे.
कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने प्रत्येक भक्ताला दिवा लावण्याची संधी मिळावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाविक या दीपोत्सव कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याची पाहायला मिळत आहे.