
सेवानिवृत्त झालेल्या 59 वर्षीय लष्कर जवानाने शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण समोर येताच पोलिसांनी त्याला अटक केली. पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने पालकांनी शीव इस्पितळात नेले होते. तेव्हा डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. अधिक चौकशीत शेजारी राहणाऱ्या काकांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये असे दोन वेळी तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले.


























































