
केरळमधील मल्लपुरम जिह्यातील तिरुनावाया शहरात दक्षिणेकडील पहिला कुंभ सुरू झाला. हा कुंभ दक्षिण हिंदुस्थानची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीला नदीच्या (भरतपुझा) काठी 3 फेब्रुवारीपर्यंत चालेल. हे ठिकाण राज्यातील प्राचीन भगवान नवमुकुंद (विष्णू) मंदिरासाठी आणि येथे दर 12 वर्षांनी होणाऱ्या मामांकम उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. राज्यात एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर हा कुंभ मेळा होणार आहे.

























































