
आयफोन यूजर्ससाठी लवकरच आयओएस 27 अपडेट आणणार आहे. कंपनी सध्या यावर वेगाने काम करत आहे. हे नवीन अपडेट रोलआउट झाल्यानंतर आयफोन यूजर्सला धमाकेदार नवीन फिचर्स मिळतील. एआयसुद्धा या अपडेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आयफोनमधील सीरी हे फिचर आणखी स्मार्ट होणार आहे. यामुळे रिमाइंडर सेट करणे आणखी फास्ट आणि सोपे होणार आहे. अॅपल एक हेल्थ प्लस सर्व्हिसही आणणार आहे. आयफोन 12, आयफोन 13, आयफोन 14, आयफोन 15, आयफोन 16 आणि आयफोन 17 सीरिजमधील फोनला हे अपडेट मिळेल.


























































