
कोंडा हा डोक्यातील केसांमध्येच होतो, असे अनेकांना वाटते. त्यामुळे डोक्यातील केस आणि त्वचेची जास्त काळजी घेतली जाते. मात्र, भुवयांमध्येही कोंडा होतो. त्याकडे फार कोणाचे लक्ष नसते.
भुवयांमधील कोंडा कमी करण्यासाठी बदाम तेल उपयुक्त ठरते. कोमट बदाम तेलाने भुवयांवर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे कोंडा कमी होतो. तसेच भुवयांचे केसही मजबूत होतात.
आणखी एक उपाय म्हणजे, कोरफडीचा गर. भुवयांवर कोरफडीचा गर लावून काही वेळाने कोमट पाण्याने धुऊन घ्या. याशिवाय कडुनिंबाचे तेल नियमित लावल्याने भुवयांजवळची मृत त्वचा आणि कोंडय़ाचा थर हळूहळू निघून जातो.

























































