
इराणने दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सकाळी ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात एका हिंदुस्थानी नागरिकासह चौघे जण जखमी झाले आहेत. विमानतळ अधिकाऱ्यांनी घटनेची पुष्टी केली आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा पुढील तपास करत आहेत. ड्रोन हल्ल्यानंतर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणने दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन ड्रोन डागले. यात दोन घाणाचे नागरिक, एक हिंदुस्थानी नागरिक आणि एक बांग्लादेशी नागरिक जखमी झाले.
























































