
इन्स्टाग्रामच्या प्रायव्हसी पॉलिसीत 8 मेपासून बदल होणार असून युजर्सच्या खासगी चॅटिंगवर त्याचा परिणाम होऊ शकतो. एंड-टू-एंड एक्रिप्शन फीचरबाबत मेटाने मोठा निर्णय घेतला आहे. मेटाच्या फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवरील खासगी चॅट यापुढे खासगी राहणार नाहीत, असे कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे.
युजर्सच्या प्रायव्हसीचे संरक्षण करण्यासाठी काही वर्षांपूर्वी मेटाने एंड-टू-एंड एक्रिप्शन फीचर लाँच केले होते. आता इन्स्टाग्रामवर पाठवलेले मेसेज पूर्वीसारखे पूर्णपणे खासगी नसतील. कंपनी आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये असा बदल करणार आहे.



























































