दही-भात पोटाच्या आजारावर आहे रामबाण उपाय, जाणून घ्या खाण्याचे अगणित फायदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या प्रत्येकाच्या घराघरांत आवडीने खाल्ला जाणारा दही-भात हा केवळ चविष्ट पदार्थ नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर असल्याचे तज्ज्ञ सांगतात. विशेषतः उन्हाळ्यात हा पदार्थ शरीराला थंडावा देण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करतो. दहीमध्ये असलेले प्रोबायोटिक्स पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि गॅस, अॅसिडिटीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढते. दही-भात खाल्ल्याने शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो आणि उष्माघात टाळण्यास मदत होते.

भातातून कार्बोहायड्रेट्स मिळतात, तर दहीतून प्रथिने, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे मिळतात. त्यामुळे हा पदार्थ शरीराला आवश्यक ऊर्जा देतो.

दहीतील चांगले बॅक्टेरिया रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो.

दही-भात हलका आणि पोटभर वाटणारा असल्यामुळे जास्त खाणे टाळले जाते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

जुलाब, अपचन किंवा पोट बिघडल्यास डॉक्टरही हलक्या आहारात दही-भात खाण्याचा सल्ला देतात.

काही संशोधनांनुसार दहीमधील घटक मेंदूवर सकारात्मक परिणाम करतात, ज्यामुळे मूड सुधारण्यास मदत होते.

सर्दी-खोकला असल्यास रात्री दही-भात टाळावा
लॅक्टोज इंटॉलरन्स असलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी
जास्त प्रमाणात खाल्ल्यास आळस येऊ शकतो