नखे स्वच्छ ठेवायची असतील तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

– हाताची नखे वाढवताना ती स्वच्छ ठेवणे मोठे अवघड काम आहे. जर नखे अस्वच्छ झाली तर दररोज हात स्वच्छ धुवा. कोमट साबणाच्या पाण्यात दोन्ही हात पाच मिनिटे भिजवून ठेवल्यास नखे मऊ होतील व घाण निघून जाईल. स्वच्छ टूथब्रशने नखांच्या खालील भाग स्वच्छ करा.

– नखे स्वच्छ केल्यानंतर स्वच्छ टॉवेलने त्याला कोरडे करा. यामुळे नखे लहान राहतील आणि नखात घाण जमा होणार नाही. नखे स्वच्छ करताना जास्त जोर लावून ती घासू नका. यामुळे नखांना दुखापत होऊ शकते.