Ratnagiri News – भक्ष्याचा पाठलाग करताना काळा बिबट्या विहिरीत पडला, वनविभागाकडून सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भक्ष्याचा पाठलाग करताना काळा बिबट्या विहिरीत पडल्याची घटना रत्नागिरीतील कोळंबे येथे घडली. अथक प्रयत्नांनंतर ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यास वन विभागाला यश आले आहे. बिबट्या विहिरीच्या कपारीत जाऊन बसल्याने पिंजऱ्यात येत नव्हता. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर अखेर बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला. वन विभागाने बिबट्याची सुखरुप सुटका करत त्याला जंगलात सोडून दिले.