ट्रम्पने मोदींना फसवलं, बेइज्जत केलं; युद्धात पाकिस्तानच्या मध्यस्थीवरून संजय राऊत यांचा निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण इस्रायल-अमेरिका युद्धात आता पाकिस्तानने उडी घेतली असून आपण यात मध्यस्थी करणार असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान शाबाझ शरीफ यांनी ट्विट केले आहे. पाकिस्तानच्या या निर्णयाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वागत केले आहे. त्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला.

”आज देशाची हालत अशी आहे की हिंदुस्थानचे अस्तित्व आहे की नाही हे कळत नाहीये. पाकिस्तान इराण आणि इस्रायलच्या युद्धात मध्यस्थी करणार आहे, त्यासाठी ट्रम्पने पाकिस्तानचे अभिनंदन केलं आहे पण हिंदुस्थान सरकार अशी भूमिका घेऊ शकले नाही. एवढा मोठा आपला देश आहे. कुठे आहेत विश्वगुरू? कुठे आहेत मोदीजी. मोदींना ट्रम्पने फसवलं आहे. त्यांना बेईज्जत केलं आहे”, असे संजय राऊत म्हणाले.