Photo – बुलढाण्यातील भाजप, काँग्रेस आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि लोणार तालुक्यातील शिंदेगट, कॉंग्रेस, भाजप आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.  शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, आमदार सिध्दार्थ खरात, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.