‘आम्ही कश्मिरी क्रॉसफायरमध्येच मरतो’; ‘इंडियाज गॉट लॅटंट’वरील टीकेवर समय रैनाचे नवे विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
still alive by samay raina kashmiri statement

‘इंडियाज गॉट लॅटंट’मध्ये सहभागी झालेला पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया याच्या वादग्रस्त विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन समय रैना आता आपल्या यूट्यूब शोच्या नवीन सीझनसह परत येणार आहे.

मंगळवारी आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या ‘स्टिल अलाईव्ह’ (Still Alive) या विशेष कार्यक्रमात त्याने ही घोषणा केली.

फेब्रुवारी २०२५ मध्ये, ‘इंडियाज गॉट लॅटंट’ या शोमध्ये रणवीर अल्लाहबादियाने पालक आणि लैंगिक संबंधांबाबत केलेल्या एका विधानामुळे समय रैनाला जबरदस्त टीकेचा सामना करावा लागला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि समय रैना, रणवीर अल्लाहबादिया व इतरांविरुद्ध देशभर पोलीस तक्रारी दाखल झाल्यामुळे हे प्रकरण चर्चेत राहिले होते.

बऱ्याच काळानंतर, समय रैनाने एका लाइव्ह ॲक्टद्वारे ‘इंडियाज गॉट लॅटंट’ वादावर थेट भाष्य केले, ज्याचे रेकॉर्डिंग त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

रणवीर अल्लाहबादियाचा उल्लेख ‘द मंक हू सोल्ड माय फेरारी’ असा करत समयने म्हटले की, ‘त्या भागात मी काहीही बोललो नव्हतो. मी एका कोपऱ्यात शांत बसलो होतो. आम्ही कश्मिरी लोक क्रॉसफायरमध्येच (दोन बाजूंच्या गोळीबारात) मरतो… त्यानंतर जणू आभाळच फाटले…’