Ratnagiri News – रत्नागिरीत उद्या रंगणार आयपीएल फॅनपार्क 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या दि.11 व 12 एप्रिल रोजी स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे आयपीएल फॅन पार्क आयोजित करण्यात आले आहे.या फॅन पार्क मोठ्या स्क्रीनवर चार क्रिकेट सामन्यांचा आनंद घेण्याची संधी रत्नागिरीतील क्रिकेटप्रेमींना लाभणार असल्याची माहिती आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे प्रतिनिधी अनिल दातार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उद्या 11 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पहिला सामना होणार आहे.त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल यांच्यात सामना होणार आहे.दुसऱ्या दिवशी रविवारी लखनौ सुपर जायंटस विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे.त्यानंतर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना होणार आहे.हे चार सामने फॅन पार्क मध्ये मोठ्या स्क्रीनवर विनामूल्य पहाता येणार आहे.यावेळी विविध फनी गेम्स आणि लहान मुलांसाठी खेळ आयोजित केले जाणार आहे.फॅन पार्क मध्ये लकी ड्रॉ काढण्यात येणार असून विजेत्याला खेळाडूंच्या स्वाक्षरीचे टि शर्ट मिळणार आहे असे दातार यांनी सांगितले.यावेळी रत्नागिरी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष दीपक देसाई.सचिव बिपीन बंदरकर,मृत्युंजय खातू,बलराम कोतवडेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.