
1 घर खरेदी करताना कागदपत्रांची सखोल तपासणी करावी. टायटल डीड हे महत्त्वाचे कागदपत्र असून विव्रेता हा मालमत्तेचा कायदेशीर मालक आहे का, हे स्पष्ट होते.
2 चेन ऑफ टायटल – या दस्तऐवजामुळे मालमत्तेच्या पूर्वीच्या सर्व मालकांचा इतिहास समजतो. त्यामुळे भविष्यात वाद होण्याची शक्यता कमी होते.
3 एन्कम्ब्रन्स सर्टिफिकेट – या कागदपत्रावरून मालमत्तेवर कोणतेही कर्ज, गहाण किंवा कायदेशीर अडथळे नाहीत याची खात्री होते. विक्री करार तपासा.
4 मालमत्तेवर कोणताही थकीत कर नाही याची खात्री करा. इमारतीचा आराखडा स्थानिक प्राधिकरणाने मंजूर केला आहे का, हे तपासणे आवश्यक आहे.
5 बांधकाम नियमांनुसार पूर्ण झाले आहे का, याची खात्री या कागदपत्रावरून होते. ओसी बघा. प्रकल्प रेरांतर्गत नोंदणीपृत आहे का, हे तपासा.



























































