मेटा आठ हजार कर्मचार्‍यांना काढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगप्रसिद्ध मेटा कंपनी पुन्हा एकदा मोठी कर्मचारी कपात करणार आहे. ही कर्मचारी कपात येत्या 20 मेपासून सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. मेटा कंपनी जगभरातून कमीत कमी 20 टक्के कर्मचारी कपात करणार आहे. त्यामुळे कंपनीतील आठ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी जाईल, हे स्पष्ट झाले आहे. ही कर्मचारी कपात पहिल्या टप्प्यातील आहे.

दुसऱ्या टप्प्यातही कर्मचारी कपात कंपनी करणार आहे. यावेळी एकूण वर्कफोर्समधील 10 टक्के कर्मचारी कपात कंपनी करणार आहे, परंतु दुसऱ्या टप्प्यात कंपनी कधी कर्मचारी कपात करेल, हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग सध्या एआयवर पह्कस करत आहेत. त्यामुळे ते अब्जावधी डॉलरची गुंतवणूक एआयमध्ये करत आहेत. मेटाने आतापर्यंतच्या कर्मचारी कपातीच्या तारखेबद्दल आणि संख्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार री-ऑर्गेनायझेशन प्रोसेसअंतर्गत काही कर्मचाऱ्यांना मेटाच्या स्मॉल बिझनेसमध्ये ट्रान्सफर केले जाईल. हा एक नवीन विभाग आहे. हा विभाग मागील महिन्यात बनवला आहे. कॅलिपहर्निया येथील या कंपनीत एका फायलिंगनुसार 31 डिसेंबर 2025 पर्यंत मेटामध्ये जवळपास 79 हजार कर्मचारी काम करत होते.

टेक कंपन्यांतील कर्मचारी धास्तावले

जगभरातील टेक कंपन्यांमध्ये सध्या जोरदार कर्मचारी कपात सुरू आहे. वेगवेगळय़ा कंपन्या धडाधड कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. या वर्षी आतापर्यंत 73 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.