
दिल्लीतील सफदरजंग भागात न्यायाधीश अमन शर्मा यांनी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले. न्यायाधीश अमन शर्मा यांनी गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिकचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.
न्यायाधीश अमन शर्मा यांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांचे घर ग्रीन पार्क परिसरात होते. पोलीस मृत्यूच्या कारणांचा तपास करत आहेत. अमन कुमार शर्मा यांनी १९ जून २०२१ रोजी दिल्ली न्यायिक सेवा जॉइन केली होती. त्यांनी पुण्यातील सिम्बायोसिस लॉ स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी गुन्हे आणि दिवानी न्यायालयातील अनेक प्रकरणांची सुनावणी केली होती. ऑक्टोबर २०२५ पासून ते कडकडडूमा कोर्टात उत्तर-पूर्व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात सचिव म्हणून नियुक्त होते.

























































