संविधान हातात घेऊन शिवकुमार यांची शपथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे दिग्गज नेते व माजी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आज संविधान हाती घेऊन कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. डी. के. हे कर्नाटकचे १८ वे मुख्यमंत्री असतील. त्यांच्यासोबत जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर अन्य १२ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे चिरंजीव प्रियंक खर्गे आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे चिरंजीव यतींद्र यांचाही त्यात समावेश आहे. शपथविधीला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते.