
स्वतःचे घर खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न सत्यात उतरताना अडचणी येत राहतात. बिल्डरला घराचे पूर्ण पैसे भरूनही ताबा मिळायला विलंब होतो.
वकिलाच्या मदतीने बिल्डरला कायदेशीर नोटीस पाठवून ताबा देण्याबाबत किंवा उशिरा घराचा ताबा मिळण्याबाबत कायदेशीर उपाय काय आहेत जाणून घ्या.
तुम्ही प्रकल्पातच राहून, विलंबाच्या कालावधीसाठी दरमहा व्याजाची मागणी करू शकता. जर तुम्हाला प्रकल्पामध्ये राहायचे नसेल तर तुम्ही भरलेले सर्व पैसे व्याजासह मिळवू शकता.
ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत ग्राहक मंचाकडे दाद मागू शकता. तुमच्या दाव्याच्या रकमेनुसार तुम्ही जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय आयोगाकडे तक्रार दाखल करू शकता.
तक्रार दाखल करण्यासाठी तुमच्याकडे बिल्डर-खरेदीदार करार (अॅग्रीमेंट ऑफ सेल) आणि हप्ते भरल्याच्या सर्व पावत्या असणे आवश्यक आहे.


























































