अमेरिकेत हिंदुस्थानी महिलेची गोळ्या घालून हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यात एका हिंदुस्थानी महिलेची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली. मेघा पटेल असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून ती मूळची गुजरातच्या मेहसाणा जिल्हातील रहिवासी आहे. मेघना यांची हत्या केल्यानंतर हल्लेखोर पळून गेला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, मेघना पटेल या गेल्या 10 वर्षांपासून अमेरिकेत राहत होत्या. मेघना पतीसोबत त्यांच्या दुकानात काम करायच्या. अज्ञात हल्लेखोराने दुकानात घुसून मेघना यांच्या गोळ्या झाडल्या आणि पळून गेला. ही सर्व घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

दरोड्याच्या उद्देशाने हा हल्ला झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी परिसर सील करून तपास सुरू केला आहे. गेल्या वर्षभरात अमेरिकेत चार गुजराती नागरिकांची हत्या झाली आहे. या घटनेमुळे परदेशस्थ भारतीयांमध्ये सुरक्षेबद्दल चिंता आणि प्रश्न निर्माण झाले आहेत.