स्वयंपुनर्विकासाला मुंबईत वाढती मागणी; पालिका आयुक्तांकडून शिफारशींवर चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारच्या समितीने स्वयंपुनर्विकास व पुनर्विकासाबाबत केलेल्या विविध शिफारशींवर महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि समितीचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्यात आज चर्चा झाली. मुंबईत स्वयंपुनर्विकासाला मोठा प्रतिसाद मिळत असून त्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.

स्वयं पुनर्विकास प्रकल्पांना बांधकाम परवानगी आणि अन्य परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजना, 10 टक्के अधिकचे चटई क्षेत्र अनुज्ञेय करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवणे, प्रीमियम दरात 10 टक्के सवलत, 9 मीटर पेक्षा कमी रुंदी असलेल्या रस्त्यालगतच्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी 9 मीटरसाठी लागू असलेले हस्तांतरणीय विकास हक्क व शासकीय एफएसआय उपलब्ध करणे, अशा अनेक शिफारशींवर या बैठकीत चर्चा झाली. त्याला भिडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.