
माजी आमदार बाळ माने यांचा आज सांगलीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार निषेध करण्यात आला. शिवसैनिकांनी बाळ माने यांचा फोटो कुत्र्याच्या गळ्यात बांधून, तसेच त्यांच्या पोस्टरला जोडे मारून संताप व्यक्त केला. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
सांगली शहरातील बाळासाहेब ठाकरे चौकात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.
कोकण विधानपरिषद निवडणुकीत बाळ माने यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून ए-बी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, पक्षाला कोणतीही पूर्वकल्पना न देता ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे
शिवसेनेचे सांगलीत निषेध आंदोलन घेतल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप आहे. सांगली जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत यांनी बाळा माने यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप करत, ‘माने सांगली जिल्ह्यात दिसल्यास तोंडाला शेण फासू,’ असा इशाराही दिला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख महादेव मगदूम, महिला आघाडी जिल्हा संघटिका सुजाता इंगळे, शकीरा जमादार, माजी नगरसेवक साजीद पठाण, सुरेश भोसले, बाळासाहेब हत्तेकर, अस्लम बाढवाले, शहर संघटक दिनेश शेलार, तालुकाप्रमुख प्रताप विचारे, युवासेनेचे मिरज शहर युवा अधिकारी कुबेरसिंग राजपूत, रोहन कोळी, चंद्रकांत जाधव, चंद्रकांत व्हरकल, लक्ष्मण वडार, पिंटू पाटील, उमेश आयरेकर, रवींद्र पवार, सूरज डावरी, दीपक पाटील, सचिन कोरे, सागर धनवे, कृष्णाबाई कोळपे, निर्मला दुधाळ, मीनाक्षी नलवडे, सुनीता थोरात, बाबू पानवाले यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



























































