थायलंडला जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड, दिल्ली विमानतळावर माघारी वळवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीहून थायलंडला जाणाऱ्या थाय एअरलाईन्सच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमान माघारी वळवण्यात आले. दिल्ली विमानतळावर विमान सुखरुप उतरवण्यात आले. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. प्रवाशांना खाली उतरवल्यानंतर तांत्रिक तपासणीसाठी विमान बे मध्ये नेण्यात आले.

टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, थाय एअरलाईन्सचे विमान दिल्लीहून थायलंडला चालले होते. विमानात 190 प्रवासी होते. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. यानंतर वैमानिकाने विमान दिल्लीला माघारी वळवले. हवेत सुमारे अडीच तास घिरट्या घातल्यानंतर दुपारी 3.15 वाजता विमान दिल्ली विमानतळावर सुखरूप उतरवण्यात आले.