
सध्या अनेकांना आयकर परतावा थांबविण्याचा मेसेज आणि ई-मेल येऊ शकतो. आयकर विवरणात विसंगतीमुळे परतावा थांबवला जातो. अशावेळी काही प्रक्रिया केल्यास परतावा मिळतो.
विवरण आणि टीडीएस या तपशिलात काहीतरी जुळत नाही. त्यामुळे सिस्टीममध्ये परतावा थांबवला जातो. करदात्यांना विवरणातील चूक सुधारण्याचीही संधी मिळते.
आपले प्राप्तीकर विवरण तपासा. फॉर्म 26एएस, एआयएस किंवा टीआयएस यामधील माहिती विवरणासोबत पडताळून घ्या. चूक असल्यास ती दुरुस्त करून सुधारित विवरण फाईल करा.
सुधारित विवरण फाईल करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत असते. त्यानंतर आयटीआर-यू अर्थात अपडेटेड विवरण दाखल करावा लागेल.
आयटीआर-यूमध्ये कर परताव्याचे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे चूक दुरुस्त करून लवकरात लवकर सुधारित विवरण दाखल करा. गरज भासल्यास तज्ञांची मदत घ्या.



























































