
रशियाची युवा टेनिसपटू मीरा आंद्रेइवाने आपल्या कारकीर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावत फ्रेंच ओपनमध्ये रशियन क्रांती घडवली. अंतिम फेरीत माजा ख्वालिनस्काचा अंतिम सामन्यात 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून आंद्रेइवा फ्रेंच ओपनची नवी राणी बनली.
या विजयासह आंद्रेइवा 1992 नंतर पॅरिसमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद जिंकणारी सर्वात युवा खेळाडू ठरली. 1992 मध्ये मोनिका सेलेस हिने वयाच्या 18 व्या वर्षी सलग तिसरे रोलाँ गॅरो विजेतेपद पटकावले होते. मीरा आंद्रेइवाच्या ग्रँडस्लॅम प्रवासाची सुरुवात 2023 मध्ये रोलाँ गॅरोमधूनच झाली होती. त्यावर्षी उपांत्य फेरीपर्यंत धडक मारत तिने जागतिक टेनिसविश्वाचे लक्ष वेधून घेतले. अवघ्या दोन वर्षांत तिने आपल्या प्रगतीचा आलेख अधिक उंचावत आता थेट विजेतेपदावर नाव कोरले आहे.


























































