
शिवकालीन इतिहासाची साक्ष देणाऱया गुहागर तालुक्यातील गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्काचा प्रश्न पुन्हा एका ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर जिह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यानंतर गोपाळगड किल्ला हा सर्वांसाठी खुला असल्याचे स्पष्ट करत अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले आहे.
गोपाळगड हा ऐतिहासिक किल्ला असून आतील काही जमीन खासगी मालकीची आहे. त्या जागेच्या अधिग्रहनाची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे. या प्रक्रियेबाबत संबंधित जागा मालकांनाही कल्पना असून त्यांचीही भेट घेतली आहे. असे नितीन बगाटे यांनी स्पष्ट केले.
संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त
गोपाळगडावर येणारे पर्यटक आणि जमीनच्या मालकांमध्ये गेल्या काही दिवसांत किरकोळ वादावादी झाली. त्यानंतर कोणताही अनुचित घडू नये यासाठी किल्ल्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आणखी काही दिवस संरक्षणासाठी पोलीस येथे तैनात राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बगाटे यांनी दिली.




















































