मुंबई महापालिकेला मराठीचे वावडे, पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात इंग्रजी फलक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मुंबई महापालिका मुख्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमात मराठीऐवजी सर्रास इंग्रजीत फलक लावल्यामुळे पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.

मुंबई महापालिकेचा कारभार शंभर टक्के मराठी भाषेतच व्हायला पाहिजे. तशी कायदात तरतूद  आहे, असे असताना महापालिकेच्या कार्यक्रमात इंग्रजी भाषेत फलक लावण्यात आल्याने हा मराठी भाषेचा अवमान असून आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी केली आहे. विशेष म्हणजे या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, अभिनेत्री दिया मिर्जा आणि क्रिकेटपटू ए.बी.डिव्हिलियर्स यांनी उपस्थिती दर्शवली होती.