
21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येतो. त्यासाठी अनेक जण उत्साहाने तयारी करतात. वेगवेगळी योगासने करतानाचे व्हिडीओ आणि पह्टो सोशल मीडियावर अनेक जण टाकतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक महिला योगासने करताना त्यात दिसते. त्यातील वेगळेपण म्हणजे, ही महिला 39 आठवडय़ांची गरोदर आहे. नवव्या महिन्यात नऊवारी साडी नेसून ती काही अद्भुत योगासने करते. बंगळुरू येथील योग शिक्षिका शशी प्रभा द्विवेदी यांचा हा व्हिडीओ आहे. चक्रासनसारखे कठीण आसन त्या अतिशय सहजपणे करताना दिसतात. अनेक वर्षांचे कठोर परिश्रम आणि सरावाचे हे फळ असल्याचे त्या म्हणतात. नेटकऱयांनीही त्यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.






















































